अडगाव बु (दिपक रेळे)– १ मे कामगार दिनानिमित्त पाणी फौंडेशन च्या वतीने आयोजित महाश्रमदानाचा कार्यक्रम गावकरी व परीसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन झाला. “माती अडवा पाणी जीरवा” ह्या अतिशय चांगल्या चळवळीला यशस्वी करण्या करीता पाणी फौंडेशन महाराष्ट्रात जिकरीचे प्रयत्न करीत आहे. आपला आजचा सहभाग च हि चळवळ यशस्वी करीत आहे. कारण चळवळ कीतीही चांगली असली तरी लोकसहभागा शिवाय ती यशस्वी करणे अशक्य असल्याचे मत अडगाव बु येथील महाश्रमदाना नंतर महाश्रमदानाला उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी सी ई ओ आयुषप्रसाद यानी व्यक्त केले. जि प अध्यक्ष संध्याताई वाघोडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महेश गणगणे, तहसीलदार संतोष येवलीकर, ग वि अ राजीव फडके, प्रा मायाताई म्हैसने, जि प सदस्य गोपाल कोल्हे,पं स सदस्य गुलाब डाबेराव, सरपंच रुख्मीनी मंगलसिंग डाबेराव, पाणी फौंडेशन चे तालुका समन्वयक अनिकेत लिखार, तंत्रज्ञ मिनाक्षी कुबडे, राधिका मालधुरे, एपीओ संदिप झाडोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. अडगाव बु गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे.आपलाच पहिला नंबर येईल या ध्येयाने आपण काम केल पाहीजे यश निश्चित मीळेल असे मत अध्यक्षीय भाषणातून संध्याताई वाघोडे यानी मांडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाण्याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार अशोक घाटे यांनी तर आभार प्रदर्शन कीशोर कोल्हे यांनी केले.
अधिक वाचा : अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola