तेल्हारा(प्रतिनिधी)– तेल्हारा नगरपरिषद परिषदेचे भाजपाचे स्वीकृत सदस्य संदीप सोळंके यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्याशी चर्चा विनिमय करून आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला.
संदीप सोळंके हे गेल्या वीस वर्षापासून संघ, विद्यार्थी परिषद व भाजपाच्या संघटनात्मक कामात अग्रेसर असल्या कारणाने तेल्हारा नगर परिषद पक्षाची सत्ता येताच पक्षश्रेष्ठींनी त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून स्वीकृत नगरसेवक पदी निवड केली होती. त्यांना मिळालेले अडीच वर्ष पूर्ण होताच पक्षश्रेठीच्या आदेशावरून त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. मिळालेल्या नगरसेवक पदाबद्दल संदीप सोळुंके यांनी खासदार संजय धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात, प्रदेश सरचिटणीस रामदासजी आंबटकर, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, डॉक्टर बाबुराव शेळके, तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांचे आभार मानले व यापुढे भाजपच्या संघटनात्मक कार्य करून पक्ष हिताकरिता अग्रेसर राहील असे सांगितले.
अधिक वाचा : अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola