अकोला(प्रतिनिधी)- यंदाची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची असून सत्ता स्थापन करण्यासाठी आपले उमेदवार कसे निवडून येतील याचा प्रचार जोमात सुरू करण्यात आला आहे.अशातच आज पार पडलेल्या विदर्भातील ७ मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी काही केल्या न वाढल्याने ५५.७८ % टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
मतदारांनी मतदान करणे हा त्यांचा हक्क असून मतदार हा हक्क बजावताना दिसून येत नसल्याने मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याचे चित्र आहे. विदर्भातील साथ मतदारसंघात मतदानाची प्रकिया पार पडली असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शासन सर्वोतोपरी पर्यन्त करीत असताना राजकीय पक्ष सुद्धा या मतदारसंघात प्रचाराला जोमात भिडले होते मात्र मतदानाची टक्केवारी काही केल्या न वाढल्याने मतदारांमध्ये काही प्रमाणात उसाह नसल्याने ४४.22 % मतदारांनी निवडणुकी च्या मतदानापासून दूर राहणे पसंद केल्याचे दिसून आले.
*विदर्भातील साथ मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी*
१)वर्धा- ५५.३६%
२)रामटेक(एस सी)- ५१.७२%
३)नागपूर- ५३.१३
४)भंडारा गोंदिया -६०.५०%
५)गडचिरोली -चिमूर – ६१.३३%
६)चंद्रपूर -५५.९७%
७)यवतमाळ – वाशीम- ५३.९७%
ऐकून टक्केवारी- ५५.७८%