अकोला(प्रतिनिधी)– अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याची ऐशि तैशी होत असल्याबाबत वृत्त प्रकाशित होऊन हिवरखेड पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.हिवरखेड पोलीस सजग झाले असून गोमांस सह अवैध धंदे वाल्याविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली.
हिवरखेड पोलीस गेल्या काही दिवसांपासून निष्क्रिय ठरत होते. हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध विरुद्ध विविध पथकाकडून कारवाया झाल्या होत्या तर हद्दीत अवैध धंदे करून बाहेर त्यांची विल्हेवाट लावतांना इतर पोलीस स्टेशन कडून कारवाया करण्यात आल्या त्यामुळे हिवरखेड पोलीस स्टेशन कारकीर्द बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.त्यामुळे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी गांभीर्याने यांची दखल घेत विविध अवैध धंदे वाल्याविरुद्ध कारवाईची मोहिम उघडल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दि ६ एप्रिल रोजी अवैध गोमांस वाहतूक व अवैध दारू विकणाऱ्या विरुद्ध कारवाई मोहीम उघडली होती.यामध्ये गोमांस घेऊन जाणाऱ्या तळेगाव बाजार येथील शेख अलीम शेख शहीद,शेख सलीम शेख शहीद,शेख अयुब शेख रजाक, शेख मुमताज शेख रहेमान या चौघांना दुचाकी व गोमांस सह अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर हिवरखेड येथे एका पान टपरी मध्ये अवैध दारू विक्री सुरू असताना रेट केली असता दीपक हिवराळे याच्या कडून अवैध दारू किंमत अंदाजे १ हजार ७४० रुपये जप्त करून आरोपिला अटक केली.
सदर कारवाई ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके, पो कॉ श्रीकृष्ण सोळंके,महादेव रोडे,गोपाल दातीर, गीतेश कामळे, निलेश तायडे, आकाश राठोड, दीपक यांनी केली.