तेल्हारा(प्रतिनिधी)– तेल्हारा तालुक्यात गोवंशाची कत्तल खुलेआम पणे सुरू असताना आज बेलखेड येथे कत्तल केलेल्या गोवंशाचे मास व लाखोंचा मुद्देमाल तेल्हारा पोलिसांनी पहाटेच्या वेळी जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील बेलखेड येथे गोवंशाची कत्तल करून संपूर्ण तेल्हारा तालुक्यात गोवंश मांसाची विक्री केल्या जाते.अशाच प्रकारची विक्रीसाठी आज बेलखेड येथे कत्तल करण्यात आलेल्या गोवंश मांसाची विक्री करण्यात येनार असल्याची गुप्त माहिती तेल्हारा पोलिसांना मिळाल्यावरून मध्य रात्री पासून कोठा शेतशिवारात सापळा रचून पहाटेच्या ४ वाजेदरम्यान गोवंश मांसाची मोटारसायकल वरून वाहतूक करणाऱ्या ८ जनांना तेल्हारा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामध्ये गोवंश मास ५ क्विंटल ४० किलो किंमत अंदाजे १ लाख ६५ हजार, सहा मोटारसायकल किंमत ८१ हजार असा एकूण २ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपी १)शेख युसुफ शेख मेहबूब, २)शेख जाकीर शेख अन्नू, ३)शेख इरफान शेख जहिर, ४)शेख अश्फाक शेख जाफर, ५)शेख गुलाब शेख कादर, ६)शेख राजीक शेख रहूफ, ७)शेख सादिक शेख वजीर, ८) शेेेख करीम शेख कादर सर्व राहणार बेलखेड अशा ८ जणांविरुद्ध कलम ४२९ भांदवी ५, ५(अ), ९,९(अ), प्राणी संरक्षण कायदा नुसार पो कॉ राजु इंगळे यांच्या फिर्यदिवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई ठाणेदार विकास देवरे, पोलिस उपनिरीक्षक निलेश देशमुख, राजू इंगळे, गणेश सोळंके, सुरेश काळे, भरत ठाकूर, वाकोडे, विजय खडसे यांनी केली. पुढील तपास पो उ निरीक्षक निलेश देशमुख हे करीत आहेत.
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंशाची खुलेआम कत्तल
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखा अकोला च्या पथकाने जवळपास १०८ गोवंशना जीवनदान देऊन जवळपास १ कोटींचा मुद्देमाल जप्त करून ८० आरोपींना अटक केली होती.तर आज बेलखेड येथे खुलेआम कत्तल करून तालुक्यात गोमांस विक्री करणाऱ्या ८ आरोपिकडून तेल्हारा पोलिसांनी रंगेहाथ पकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे खुलेआम सुरू असताना कारवाया का केल्या जात नाही असा सवाल जनतेला पडला आहे.
अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पथकाकडून कारवाया होत असतांना मात्र हिवरखेड पोलीस स्टेशन कडून कुठल्याच कारवाया केल्या जात नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी याची दखल घेन्याची गरज आहे.
अधिक वाचा : हिवरखेड जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय येथे चोरट्यांचा संगणकावर डल्ला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola