तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील वाळू माफियांनी नवीन शक्कल लढवली असून त्यांच्या रडारवर आता शेततळे टार्गेट करून वाळूचा उपसा करण्यात येत आहे.काल रात्री शेततळ्यातून वाळूची चोरी करणाऱ्या १४ जणांविरुद्ध तेल्हारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडेगाव हद्दीत येणाऱ्या तसेच तेल्हारा कृषी विभागाच्या मालकीच्या शेततळ्यातून दरोरोज वाळूची चोरी होत होती.काल रात्री १० वाजेच्या दरम्यान अशाच प्रकारे वाळूची चोरी होत असल्याची गुप्त माहिती तहसील कार्यालयाचे गाडेगाव चे तलाठी बालाजी केंद्रे यांना गावकऱ्यांनी दिली त्यावरून तलाठी केंद्रे यांनी दखल घेत त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे वाळूची चोरी सुरू असल्याचे समोर आले याठिकाणी शेकडो ब्रास रेती चोरून नेल्याचे स्पस्ट झाले असून सदर शेततळ्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे.यामध्ये जवळपास ५० हजाराची वाळूची चोरी केल्याची तक्रारीत म्हटले आहे.काल रात्री अशाच प्रकारे वाळूची चोरी होत असताना तलाठी केंद्रे यांनी टॅक्टर चालक व मजूर अशा १४ जणांविरुद्ध विरुद्ध तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरा तक्रार देऊन कलम ३७९,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*घोडेगाव पुनुरावृत्ती टळली*
गेल्या पाच वर्षांपूर्वी घोडेगाव शेतशिवारातील आस नदीमध्ये अशाच प्रकारे मातीची अवैधपणे खोदकाम सुरू असताना तीन मजुरांचा मातीचा ढिगारा खचून त्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यु झाला होता.त्यावेळी सुद्धा तलाठी केंद्रे यांच्या कार्यक्षेत्रात हे प्रकरण झाल्याने त्यांच्यावर सदर प्रकरण चांगलेच अलंगट आले होते.असाच प्रकारे सदर शेततळे खोदकाम सुरू होते त्यामुळे या ठिकाणी सुद्धा वेळीच कारवाई झाली नसती तर घोडेगाव सारखी पुनुरावृत्ती झाली असती.
सदर शेततळे गाडेगाव येथील पाणी फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते त्यामुळे शेततळे विद्रुपीकरण करण्याचे काम वाळू माफिया कडून सुरू असल्याची बाब समोर आल्याने गाडेगाव येथील गावकऱ्यांनी या बाबत काल आवाज उठविला होता.
तहसील कार्यालयाची भूमिका संशयास्पद
अकोला जिल्हयात वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्याने वाळूची अवैधपणे उपसा करून सरकारी मालमतेवर डल्ला मारण्याचे काम सुरू असताना तहसील कार्यालयाचा कुठल्याच अधिकाऱ्याला याची जाणीव नसेल तर नवलच कारण तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कारवाईच्या नावाखाली मलिदा लाटण्याचे काम काही कर्मचारी अधिकारी खुलेआम पणे करीत आहेत.काही दिवसांपूर्वी असाच एक रेतीचा टिप्पर शहरातील एका पेट्रोल पंप जवळ पकण्यात आला होता.सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्त तहसील कार्यालयाचे कर्मचारी असा बंदोबस्त होता.जवळपास पाच तास सदर टिप्पर त्या ठिकाणी उभा होता मात्र नंतर तो सदर ठिकाणावरून पळून गेला होता.याबाबत माहिती केली असता कर्मचारी अधिकारी यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे देण्यात आली होती.त्यामुळे तहसील कार्यालयाचा कारभार आणि कारवाया नेमक्या कोणत्या उद्देशासाठी करण्यात येतात हे सांगण्याचे वेगळे काम नाही.
अधिक वाचा : आडसुळ येथे भरचौकात युवकावर प्राणघातक हल्ला,६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola