वाडेगाव (डॉ शेख चांद) : दि. २८ मार्च ला मतदान हा भारतीय संविधानाने दिलेला सर्वोच्च हक्क आहे. या उपक्रमाचे आयोजन ‘आई -बाबांस पत्र ‘मतदान कराच’ या अभिनव उपक्रमाअंतर्गत श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल, वाडेगांव येथे घेण्यात आले.
या उपक्रमा अंतर्गत तब्बल इयत्ता 5वी ते 9वी च्या 277 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पालकांना पत्र लिहून येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची ‘आई -बाबांस पत्र’ लिहून विनंती केली व एक विक्रम प्रस्थापित केला आहे.मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा, सर्वांचा हक्क तर आहेच सोबत कर्तव्य देखील आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. जर मुलांनी त्यांच्या आई -बाबा, आजी -आजोबा, ताई -दादाला मतदान करण्याचा हट्ट केला तर ते ऐकतातच म्हणून मुलांनी त्यांच्या सुवाच्य, सुंदर हस्ताक्षरात पालकांना पत्र लिहून मतदानाची विनंती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘आई -बाबांस पत्र ‘या अभिनव उपक्रमासाठी चे आयोजन मुख्याध्यापक एम. डी. मानकर सर, प्रणव मानकर सर, सौ. गावंडे मॅडम, प्रतिभा भोंडे मॅडम,प्रशांत उगले सर,अतुल राहूडकार सर, उजाडे सर, निलेश सरप सर, मंगेश सरप सर, प्रवीण इंगळे सर, शुभांगी फाळके मॅडम, विद्या पाखरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले. मुलांनी ‘ आई -बाबांस’ लिहीलेल्या पत्रांन पैकी उत्कृष्ट दोन पत्र जिल्हा लेव्हलवर पाठविण्यात येणार आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola