वाडेगाव (डॉ शेख चांद) : वाडेगांव येथील भारत डोंगरे यांचे ग्राम पंचायत कार्यलय समोर दि २६ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजता पासून इ क्लास जमीनी वरील ग्राम पंचायत सदस्यांनी केलेले अवेंध अतिक्रमण काढणे विषयी आमरण उपोषणाला बसले होते.
आज रोजी उपोषण करत्याला उपोषण सुरू कऱ्याला ४८ तास झाले तरी शासना कडून कोणताही अधिकारी भेट देण्यासाठी आला नाही . जो पर्यंत अतिक्रमण काढले जात नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही असे भारत डोंगरे यांनी सांगीतले . या संदर्भात दि १२ मार्च २०१९ ला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अकोला यांना तसेच मा. ठाणेदार साहेब बाळापूर तसेच इतर संबंधीत विभागात आमरण उपोषण संदर्भात पत्र दिले असून २६ मार्च पासून आमरण उपोषणास भारत कैलास डोंगरे यांनी सुरुवात केली होती. आज त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने ग्राम पंचायत सचिव यांना संबंधित सदस्यांवर कारवाई करून अतिक्रमण काढण्याचे काल दि २७ रोजी आदेश दिले होते.आज 12.30 वाजताच्या दरम्यान उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी उद्या पासून अतिक्रम काढण्यास सुरुवात करू असे ग्राम विकास अधिकारी यांनी लेखी पत्र दिल आहे यावेळी जि प सदस्य डॉ हिम्मतराव घाटोळ, पं स सदस्य प्रशांत मानकर,वैभव पाटील, उपसरपंच मंगेश राहुडकार, दमाराम डोंगरे, किशोर अवचार, राजवर्धन डोंगरे , राजेश डोंगरे, बुडडा ठेकेदार , जगदीश लोध, गौतम डोंगरे, दिनेश धाडसे , विकाश जंजाळ, इत्यादी उपस्थीत होते.
या संदर्भात अवर अकोला न्युज ने वेळोवेळी पाठपुरावा करून या प्रकरणात वाचा फोडण्याचे काम केले होते त्यामुळे शासनाला भारत डोंगरे यांच्या उपोषणाची गंभीर दखल घेऊन उपोषणाची सांगता करून कारवाई करण्यास भाग पाडले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola