तेल्हारा (प्रतिनिधी) : जागतिक वनदिन व रंगपंचमी एकाच दिवशी येणे हा योगायोगच. पळस, पांगारा,शाल्मली, या वृक्षांची बहरलेली फुले म्हणजे निसर्गाचा रंगोत्सवंच. मनुष्य मात्र या फुलांपासून तयार होणाऱ्या रंगानऐवजी हानिकारक रसायनयुक्त रंगांचा वापर करतांनाच आढळतो. परंतु याला छेद देत येथूनच जवळ असलेल्या गाडेगाव येथील निसर्ग व पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत वान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मात्र अनोखी रंगपंचमी साजरी केली. गावाजवळील वाण धरण प्रकल्पाच्या कालव्यावरील कडुनिंबाच्या पस्तीस झाडांची रंगरंगोटी करण्यात आली.
रंगरंगोटी केल्यानंतर झाडांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्षही ही झाडे वेधून घेत आहेत. या निमित्ताने रंगपंचमीच्या उत्सवामध्ये निसर्गालाही सहभागी करून घेतल्या गेले. खरे तर सर्व भारतीय सण निसर्गाधारीत जीवनपद्धतीला अनुसरूनच आहेत. निसर्गसंवर्धनाचा संदेश या निमित्ताने वाण फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दिला.
या आगळ्या वेगळ्या रंगपञ्चमी उत्सवामध्ये वाण फाऊंडेशनचे कार्यकर्ते विजय बोर्डे, धनंजय गावंडे, प्रमोद ओहे, उत्तम नळकांडे, शुभम वडतकार, विजय उजाड,अक्षय सोनोने, निवृत्ती वाकोडे, अक्षय काळे,रवी गवई, प्रकाश साबळे, रोषण वडतकार, गोकुळ हिंगणकार सह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : पातूर पर्यटन केंद्रात उभारल्या पक्ष्यांसाठी पाणपोई, जागतिक चिमणी दिवसानिम्मित अभिनव उपक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola