पातूर (सुनील गाडगे) : जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल व वनविभाग पातूरच्या वतीने निसर्ग पर्यटन स्थळ येथे बुधवारी पक्ष्यासाठी पाणपोई उभारण्यात आल्या.
पातूर वनविभागांतर्गत येणाऱ्या निसर्ग पर्यटन स्थळ येथे जागतिक चिमणी दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. सामदेकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्र सहाय्यक कु. पी. टी. धर्माळे, निसर्ग कट्टा चे प्रा.डॉ. मिलिंद शिरभाते, डॉ. सौ अमृता शिरभाते, किड्स पॅराडाईजचे अध्यक्ष गोपाल गाडगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच वनरक्षक आर. आर. वैद्य, पी. व्ही. मेश्राम, ए. आर. घुगे,एस. पी राठोड, ए. ए. बडगुजर, एस. व्ही. काळे, एन. डी. डाखोरे, डी. एस. बुंदे, एस. पी. जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जागतिक चिमणी दिवसाचे महत्व विषद केले. व पक्षी संवर्धनाची शपथ घेण्यात आली.
यानंतर पक्ष्यासाठी मातीच्या पाणपोई पर्यटन केंद्रातील झाडांवर लावण्यात आल्या. यावेळी शाळेच्या विदयार्थ्यांनी पाणपोई लावण्यासाठी मदत केली. या परिसरात लवकरच किड्स पॅराडाईजच्या वतीने चिमण्यांसाठी कुत्रीम घरटे सुद्धा लावण्यात येणार आहेत. यावेळी पत्रकार निशांत गवई, किड्स पॅराडाइजच्या शिक्षिका कुसुम निखाडे, शुभम पोहरे, वनमजूर विजय वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोल्यात विविधरंगी माठ विक्रीसाठी दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola