अकोला (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विविध ठिकाणी माठांची विक्री सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथून हे माठ विक्रीस आणले जातात. या माठांची ग्राहकांना चांगलीच भुरळ पडली असून माठ खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत.
गरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या आणि उन्हाळ्यात थंड आणि शुद्ध पाणी देणाऱ्या माठांची विक्री करण्यासाठी अनेक विक्रेते जिल्ह्यात आले आहेत. स्थानिक माठाबरोबरच हे विक्रेते मातीपासून तयार केलेल्या पाण्याच्या बाटलीची विक्री करत आहेत.
उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात काळ्या रंगाचे मातीचे माठ विक्रीस येतात. तोचतोपणा या माठामध्ये राहत असल्याने ग्राहक त्याच्याकडे फिरकत नव्हते. मात्र, आता या माठामध्ये नवनवे प्रकार येत आहेत. हे माठ काळ्या रंगात न राहता त्यांना विविधरंगी, असे आकर्षक रंग देऊन सजविण्यात येत आहेत. तसेच त्यावर विविध प्रकारची कलाकुसर करून ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे. हे माठ फ्लॉवरपॉट सारखेच दिसत असल्याने ग्राहकही त्यांच्याकडे आकर्षिले जात आहेत. त्यामुळे या माठांना आधी पेक्षा जास्त भाव मिळत आहे. हे माठ इतर प्लास्टिकच्या वस्तूपेक्षा टिकाऊ असल्यामुळे नागरिक या माठांना पसंती देत आहेत.
अधिक वाचा : अकोला लोकसभा निवडणूक शानंततेत पार पाडा-अप्पर पोलीस महासंचालक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola