हिवरखेड (प्रतिनिधी)– हिवरखेड ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या महापारेषनच्या १३२ के.व्ही.केंद्राला कर न भरल्याच्या कारणावरून सील ठोकण्यात आले आहे.
हिवरखेड येथील अति महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महापारेषणच्या १३२ के व्ही केंद्राला हिवरखेड ग्रामपंचायत ने आज केंद्राच्या जागेचा कर न भरल्याने आज सकाळी दोन कर्मचाऱ्याना आतमध्ये डांबून केंद्राला सील मारले.सदर १३२ केंद्रावरून शेकडो आदिवासी गावांमध्ये तसेच ३३ केव्ही ७ सबस्टेशन यावर असून त्यांना विद्युत पुरवल्या जाते.अशा परिस्थितीत अति आवश्यक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या केंद्राला आज सील लावण्यात आले आणि विशेष म्हणजे तेथील दोन कर्मचाऱ्यांना सुद्धा आतमध्ये ठेऊन बाहेरून सदर केंद्र सील करण्यात आल्याने केंद्राबाहेर एकच खळबळ माजली आहे.तात्काळ जर काही इमरर्जन्सी आली तर त्याला अशा परिस्थितीत कोण जबाबदार राहणार सद्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून या कारवाईचा त्यांना सुद्धा परीक्षेचा काळात सामना करावा लागणार आहे.अशातच सद्याच्या परिस्थिती मध्ये महापारेषण व ग्राम पंचायत प्रशासनाणे त्वरित यावर तोडगा काढावा जेणेकरून पुढे कुठल्या घटनेला सामोरे जावे लागणार नाही.
ग्राम पंचायतच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय
आज ग्राम पंचायत प्रशासनाकडून १३२ केव्ही केंद्राला एक नोटीस लावून सील करण्यात आले सदर नोटीस वर आज १९-०४-२०१९ रोजी सदर मालमत्ता जप्त करण्यात येत आहे असे नमुद करण्यात आले आहे मात्र आज रोजीची दिनांक १९-३-२०१९ आहे.यावरून ग्राम पंचायत किती दक्ष पणे कारभार चालवत आहे हे दिसून येते.
अधिक वाचा : राष्ट्रीय लोक अदालत ३४५ प्रकरणांचा समेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola