अकोला (डॉ शेख चांद)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा, मुम्बई यांच्या सुचनेनुसार २०१९ सालचे पहिले राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन रविवार दिनांक १७ मार्च २०१९ रोजी अकोला जिल्हा न्यायालय तसेच अकोला जिल्हयातील सर्व दिवानी व फौजदारी न्यायालय येथे त्याचप्रमाणे कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबीक न्यायालय, औद्योगीक न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.
लोक न्यायालयाचे उद्घघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष श्री य. गो. खोब्रागडे, जिल्हा न्यायाधिश – (०१ ) श्रीमती एम. आय. आरलँड मॅडम व जि. वि. से. प्राधिकरण सचिव श्री अमीत कोकरे यांच्या हस्ते झाले व मार्गदर्शन लाभले, तसेच अकोला चे प्रबंधक श्री ए एस लव्हाळे, मॅनेजर अभिजीत जैनकर, तसेच न्यायाधिश श्रीमती के बी अग्रवाल, जिल्हा न्यायाधिश – ( ६ ) एस पी पोळ, सह दिवानी न्यायाधिश श्रीमती एस एम बैस, सह दि. न्या. क. स्तर एस व्ही चांडक, ४थे सह दि.न्या.क. स्तर एस बी विजयकर , ५ वे सह दि. न्या.क. स्तर श्रीमती एम.डी. नन्नवरे, ६ वे सह दि. न्या.क. स्तर एस डी सैदाने, ७ वे सह दि. न्या.क. स्तर ए बी रेडकर, ८ वे सह दि. न्या.क. स्तर एस एम घुगे, केदार सर, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अधिक्षक आर एम निकुम, वरीष्ठ लिपीक एस पी टाकळीकर, कनिष्ठ लिपीक व्हि आर पोहरे, कनिष्ठ लिपीक के जे पांडे त्याच प्रमाणे सर्व अँडोकेट, सर्व सोसल् वर्कर, विधी स्वयम सेवक, सर्व कर्मचारी बंधु इत्यादी उपस्थीत होते. तसेच अकोला जिल्हा मिळून बि एस एन एल तसेच विविध बॅकेची एकूण २९५७ दखल पुर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तडजोडी करीता आली होती. त्यापैकी १३९ प्रकरणा चे समेट घडून आनला त्यातील एकून तडजोड रक्कम रूपये ९४,२५, ३३६ एवळी आहे.
अकोला जिल्हयातील विविध तालुका न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणा पैकी एकून २५८९ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सुनावनी करीता प्रस्थावित करण्यात आली होती. त्यापैकी एकून ३४१ प्रकरणात समेट घडून आला. त्यातील एकून तडजोड रक्कम रूपये ५, ३५, ८५, १२२ / – एवळी आहे. यावेळी पॅनल सदस्य म्हणून उपस्थीत न्यायाधिश, वकील अॅड एस ए राजगुरू, अॅड .पल्व,वी देशमुख, अॅड सारीका घिरणीकार, अॅड आनिसा शेख, अॅड राधा मिश्रा, अॅड संगीता कोंडाने, अॅड आरती यादव, अॅड लता वाघेला, अॅड सिमा बाजड, तसेच समाजसेवक म्हणून गजानन दांडगे, डॉ चांद शेख, रवी निटकरे, विकाश रामटेके, शाहनवाज खान, पवन खडे इत्यादी विधी स्वयम सेवक उपस्थीत होते. लोक न्यायालय यशस्वी होने करीता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष श्री य. गो. खोब्रागडे ,जिल्हा न्यायाधिश – (०१ ) श्रीमती एम. आय. आरलँड व जि. वि. से. प्राधिकरण सचिव श्री अमीत कोकरे यांच्या मार्गदर्शनात अकोला चे प्रबंधक श्री ए एस लव्हाळे , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अधिक्षक आर एम निकुम, वरीष्ठ लिपीक एस पी टाकळीकर, कनिष्ठ लिपीक व्हि आर पोहरे, कनिष्ठ लिपीक के जे पांडे, शिपाई श्रीमती विमल अहीरकर, शाहाबाज खान यांनी परिश्रम घेतले. असे श्री अमीत कोकरे जिल्हा विधी से. प्राधिकरण, सचिव, अकोला यांनी कळविले आहे.
अधिक वाचा : राष्ट्रिय लोक अदालत कामगार व औद्योगिक न्यायालय अकोल्यात एकूण 10 प्रकरण निकालात निघाले..!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola