अकोला (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासनाने अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज रहावे व येणारी निवडणूक शांतता व निर्भयपणे पार पाडावी असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन भवनात लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतांना वरिष्ठ अधिकारा-यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हापोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लढाड, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घरोघरी जावून बि.एल.ओ. मार्फत दुबार मतदारांची पडताळणी करुन अद्यावत यादी पुर्ण करावी असे सांगून विभागीय आयुक्त पुढे म्हणाले की, या निवडणूकीत व्हीव्ही पॅड चा पहिल्यांदाच वापर होत असल्यामुळे मतदान केंद्रावर प्रशिक्षीत अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करावी व त्यांना योगय प्रशिक्षण द्यावे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखे पर्यंत नविन मतदार नोंदणीची कार्यवाही पुर्ण करुन अंतिम तारखेच्या दिवशी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावी अश्या सुचना श्री पियुष सिंग यांनी दिल्यात.
दिव्यांग मतदारांसाठी विनामुलय वाहतुक सेवा व व्हील चेअरची व्यवस्था करावी यासाठी स्वतंत्र सेवकाची नियुक्ती करावी. आवश्यकता वाटल्यास महानगरपालिका, जिल्हापरिषद व नगरपालिका यांनी व्हील चेअर खरेदी कराव्यात. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदार, वृध्द व गर्भवती महिलांसाठी मतदान केंद्रावर वेगळी रांग असावी असे त्यांनी सांगीतले.
विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी मतदान केंद्रावरील मुलभूत सुविधा, संवेदनशिल मतदान केंद्र, दिव्यांग मतदार, ईव्हीएम-व्हीव्ही पॅडची स्थिती , निवडणूक असेलेली वाहतुक व्यवस्था, माध्यम प्रमाणीकरण व संनियत्रण समिती, निवडणुक खर्च समिती, सुगम सुविधा, समाधान या आयटी ॲप, सिव्हीजल समिती, कायदा व सुव्यवस्था आदी निवडणूक विषयक विविध बाबींचा आढावा घेतला.
या बैठकीला सहाही विधानसभा मतदार संघाचे सहाययक निवडणूक अधिकारी, विविध समित्यांचे नोडल अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाचे अॅप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola