बाळापूर(प्रतिनिधी)– आगामी लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून बाळापूर पोलिसांनी अवैध धंद्या विरुद्ध मोहीम सुरू केली असून मागील तीन दिवसांत बाळापूर शहरात 2 जुगार वर कारवाई करून एकूण 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले व त्यांचे कडून एकूण 3275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच कोळसा, रिधोरा, व्याला, मनारखेड येथे अवैध हातभट्टी तसेच अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध धडक कार्यवाही करून एकूण 3 आरोपींना ताब्यात घेऊन 4 गुन्हे दाखल केले, एक आरोपी फरार झाला , एकूण 15,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची धडक मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, भालतीलक, पोलिस कॉन्स्टेबल राठोड, हर्षल श्रीवास ह्यांनी केली.