अकोट (प्रतिनिधी) – आकोट तालुक्यातील बोर्डी येथील जिल्हा परीषद प्राथमिक वरिष्ठ शाळा बोर्डी येथील सन २०१७ -१८ ला शाळेचे बाधंकाम करण्यात आले होते. हे बाधंकाम करत असताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार बोर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते देवानंद खिरकर यांनी दि १६/०७ /२०१८ रोजी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीवरुन दि ०४/०४/२०१८ रोजी शिक्षण सभापती जि. प. अकोला व यांनी भेट देवुन बाधंकाम संबधीत व आर्थिक अभिलेखाची तपासणी केली.
तसेच गटशिक्षणअधिकारी अकोट यांनी दि १३/०८/२०१८ ला जि प प्राथ वरिष्ठ शाळा बोर्डी भेट देवुन देवुन बांधकाम संबधीत आर्थिक अभिलेख्यांची तपासणी केली असता ५ लाख ३४ हजार ८५० रु चे आक्षेपीत बिले आढळुन आले. याबाबतचा अहवाल दि १/१०/२०१८ रोजी जिल्हा कार्यलयास पाठवुन आर्थिक अभिलेख्याची तपासणी हि स्थानिक लेखा परीक्षण अधिकारी याचे मार्फत करण्यात यावी व फौजदारी कारवाई करण्यापुर्वी लेखाधिकारी याचे लक्षात घेणे आवश्यक आहे असे मत गटशिक्षणअधिकारी अकोट यांनी पाठवलेल़्या दि १७ /११/२०१८च्या मा. जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथ. जि. प. अकोला यांना पाठवलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. जि. प. प्राथ. शाळा बोर्डी येथील सन २०१७ ते १८ ला शाळा बाधंकामाची व भष्टाचाराची चौकशी करीता सामाजिक कार्यकर्ते देवानंद खिरकर यानी पालंकमञी याच्या जनता दरबारात सुद्धा करण्यात आली असुन यावर पालकंमञी यांनी चौकशी करुन अहवाल व दोषी माजी मुख्याध्यापक रविंद्र सलामे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अणिल ताडे विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे बोले जात आहे.
अधिक वाचा : अवैध रेतीच्या दंडाची रक्कम वसूल होत नाही तोच चोरीच्या रेतीवर चोरट्यांचा डल्ला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola