अकोट (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येणाऱ्या बोर्ड़ी येथे अवैध रित्या उत्खनन केलेली ४ ब्रास रेती अकोट महसूल विभागाने तब्बल अडीच वर्षांअगोदर जप्त करून त्यावर 63,332 रूपयाचा दंड केला, मात्र ही दंडाची रक्कम अद्यापर्यंत वसूल झाली नाही हा अवैध रेतीचा साठा जप्त करण्यात आला होता, चोरीच्या रेतीवर चोरटे डल्ला मारत असतांना मात्र महसूल विभाग बघ्याची भूमिकेत का ? यामुळे तलाठीसह अकोट महसूल विभागावर जनतेकडून प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, अकोट तालुक्यातील बोर्ड़ी येथील राहवासी असलेल्या जितेंद्र विश्वनाथ आतकड यांच्या शेतात ४ ब्रास अवैध रेती साठा असल्याचे आढळून आले, 22 सप्टेंबर 2016 रोजी बोर्डी येथील तलाठी यांनी रीतसर पंचनामा करून जप्त केली होती, सदर अवैध रेती प्रकरणात अकोट तहसीलदार यांनी 15 नोव्हेंबर 2016 रोजी 63,332 रूपयाचा दंड आकारून वसुलीचे आदेश काढले मात्र ती दंडाची रक्कम अद्यापही वसुल करण्यात आली नाही, ऊलट त्यातीलच रेती चोरीला जात आहे, पुरावा नष्ट झाल्यास दंडाची रक्कम वसूल होणार तेरी कोठून असा ही प्रश्न निर्माण होतो, या सर्व बांबीमुळे महसुल विभाग या कडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत असून कागदी घोड्यांची धुमाकूळ घालून सक्रियता असल्याचे जनतेला भासवून देत आहे, बोर्ड़ी येथील तलाठीयानी पाहणी करुन सदर ४ ब्रास जप्त केलेल्या रेतिमधून पुन्हा रेती चोरीला गेल्याचे आढळले असा अहवाल अकोट तहसीलदार यांच्या कडे दाखल केला असला तरी आजपर्यंत दंडाची रक्कम थकीत आहे, सदर प्रकरणची तक्रार ही जनता दरबार मध्ये सुध्दा करण्यात आली आहे.मात्र अद्याप पर्यन्त कुठलेच पाऊल प्रशासनाकडून उचलल्या गेले नाही.
अधिक वाचा : हेल्मेटशिवाय रॅलीत सहभागी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई : डीसीपी पंकज देशमुख
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola