अकोला (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिलेल्या निर्देशानुसार डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने येथील शासकीय महिला औद्योगिक संस्थेच्या मदतीने ज्वारी, बाजरी पिकांपासून पौष्टीक अशी ११ प्रकारची बिस्कीटे व कुकीज तयार केली. नुकतेच त्यांचे राजभवनात सादरीकरण करण्यात आले असून, सकारात्मक अहवालाची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या अधिकऱ्यांची बैठक घेऊन, राज्यातील मुख्य पीक ‘ज्वारी, बाजरी पिकांची व्हॅल्यू ॲडिशन करण्याचे व संशोधनातून नाविन्यपूर्ण बेकरी उत्पादने तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.प्रदीप बोरकर व त्यांच्या टीमने अकोला शासकीय महिला औद्योगिक संस्थेच्या ‘बेकरी अँड कन्फेशनरी’ ट्रेडला १२ जानेवारी २०१९ रोजी भेट दिली व बेकरी उत्पादने निर्मितीसाठी सहाय्य घेतले. औद्योगिक संस्थेचे निदेशक, आजी व माजी प्रशिक्षणार्थीनी यांच्या मदतीने व कृषी विद्यापीठाच्या मागदर्शनात नाविन्यपूर्ण प्रयोग करून, ज्वारी, बाजरी, नाचणी, भादली व अन्य घटक वापरून (मैदा विरहीत) १५ प्रकारची बिस्किटे व कुकीज तयार करण्यात आली. कमी ग्लूटेन, जास्त फायबर, पचनास हलकी व पौष्टीक अशा बिस्किट व कुकीजची कृषी विद्यापीठाचे डॉ.प्रदीप बोरकर व त्याच्या टीमने पाहणी करून प्राथमिक निवड केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांचे अध्यक्षतेखालील उच्चस्तर तज्ज्ञ समितीने त्यांचेपैकी ११ प्रकारांची निवड केली. निवडलेले बिस्किट व कुकीजचे विद्यापीठाच्या वतीने राजभवनात सादरीकरण करण्यात आली असून, सकारात्मक अहवाल प्राप्त होण्याची अपेक्षा केली जात आहे.
अधिक वाचा : अवैध रेतीच्या दंडाची रक्कम वसूल होत नाही तोच चोरीच्या रेतीवर चोरट्यांचा डल्ला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola