• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

हेल्मेटशिवाय रॅलीत सहभागी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई : डीसीपी पंकज देशमुख 

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 15, 2020
in राज्य
Reading Time: 1 min read
78 1
1
भाजप
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या “विजय संकल्प रॅली‘मध्ये सहभाग घेताना वाहतुकिचे नियम पायदळी तुडविणाऱ्या भाजप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे वाहतूक शाखेची नुकतीच जबाबदारी स्वीकारलेले पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

“पक्ष कोणताही असो, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असेल, हेल्मेट परिधान केले नसेल, तर संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली जाईल’ असे देशमुख सांगत आपल्या पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

उस्मानाबाद पाठोपाठ, सातारा येथे पोलिस अधिक्षक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या देशमुख यांची मागील आठवड्यात पुण्यात पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली. तर साताऱ्याच्या पोलिस अधिक्षकपदी पुण्यातील वाहतुक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती झाली. दरम्यान, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडून कायम प्राधान्य दिल्या जाणाऱ्या वाहतूक शाखेची जबाबदारी सातपुते यांच्यानंतर देशमुख यांच्या खांद्यावर देण्यात आली. देशमुख यांनी शुक्रवारी आपल्या कामाची सुत्रे हाती घेऊन कामाला सुरवात केली.

हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचा विजय साजरा करण्यासाठी शहरातील आठही मतदारसंघांमध्ये  भाजपने दुचाकी रॅली काढली होती. हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपच्या दुचाकी रॅलीमधील बहुतांश कार्यकर्त्यांनी हेल्मेटचा वापरच केला नव्हता. त्याचबरोबर रॅलीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघनही केल्यामुळे “आता त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार का,’ असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरीकांकडून उपस्थित केला जात होता.

दरम्यान, देशमुख यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी भाजपच्या दुचाकी रॅलीमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतुक पोलिस कारवाई करणार काय, असा प्रश्‍न देशमुख यांना पत्रकारांनी विचारला. त्यावेळी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता, “वाहतुकीचे नियम सर्वांना सारखे आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची सीसीटीव्हीद्वारे पाहणी करुन पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. रविवारच्या दुचाकी रॅलीमध्ये जर वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच त्यांच्यावरही कारवाई होईल.’ असे स्पष्ट केले.

दरम्यान, शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकासकामे सध्या जलदगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. पोलिसांकडील मनुष्यबळही कमी आहे. मात्र पुणेकरांनीच स्वतः वाहतुकीची शिस्त पाळल्यास पोलिसांवरील ताण कमी होईल. तरीही पुणेकरांना सुरळित व सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील राहतील. पादचाऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल, त्याचबरोबर वाढते अपघात थांबविण्यासाठी महापालिकेसह अन्य संस्थांशी समन्वय ठेवून ठोस उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा : भाजप सरकारच्या कार्यकाळात तयार केलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत- नितीन गडकरी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोला जिल्ह्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ होणार !

Next Post

अवैध रेतीच्या दंडाची रक्कम वसूल होत नाही तोच चोरीच्या रेतीवर चोरट्यांचा डल्ला

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अवैध रेतीच्या दंडाची रक्कम वसूल होत नाही तोच चोरीच्या रेतीवर चोरट्यांचा डल्ला

अवैध रेतीच्या दंडाची रक्कम वसूल होत नाही तोच चोरीच्या रेतीवर चोरट्यांचा डल्ला

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व अकोला महिला ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेची बिस्किटे राजभवनात

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व अकोला महिला ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेची बिस्किटे राजभवनात

Comments 1

  1. Pingback: अवैध रेतीच्या दंडाची रक्कम वसूल होत नाही तोच चोरीच्या रेतीवर चोरट्यांचा डल्ला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.