अकोट (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजातील बलुतेदार अलुतेदार या अठरा पगड जातीतील लोकांची जात पुसून टाकत त्यांना मावळा ही ओळख दिली. त्यांना लढण्याचा प्रशिक्षण दिलं, हातात दाडपट्टा आणि तलवारी दिल्या,घोड्यावर बसवलं आणि याच शिवतंत्राचा वापर करून इथल्या उपेक्षित घटकाला वंचित या सूत्रात बांधून सत्तेत बसवण्याचे काम अॅड. बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन प्रामाणिक पणे करत आहेत म्हणुन अॅड. बाळासाहेब आंबेडकर हेच खरे शिवरायांचे वैचारिक वारसदार असल्याचे प्रतिपादन नाभिक समाजाचे नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रथा. गोविंद दळवी यांनी केले.
ते अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती निमित्य आयोजित जाहीर व्याख्यानात बोलतं होते. ते पुढे म्हणाले की, गाडगेबाबांनी समाजाला घातक रूढी , परंपरा, अंधश्रध्येतुन बाहेर काढले. त्यासाठी त्याग, समर्पण आणि परीश्रम घेत गावोगावी शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले असे प्रा.दळवी यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचे विचार आचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच काम आपण सर्वांनी एकमताने केले पाहीजे असा संदेश ही व्याख्यानमालेतुन लोकांना दिला.याकार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारिप बमसं चे युवा नेता संजय पुंडकर तर प्रमुख अतिथी म्हणुन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे विभागीय अध्यक्ष नितेश कीर्तक,कोल्हापुर जिल्हा उपनिरीक्षक तथा अकोला महानगर महासचिव पवन गजानन गवई, प्रतुल विरघट, प्रा.विठ्ठल कुलट, अॅड.देवानंद फुसे, राजेश पुंडकर, हरीहर पळसकर, हिंतमराव वालकडे, अजाबराव दराळे, राम राठोड, मा.सभापती रामकृष्ण धांडे , रणजित पुनकर, लक्ष्मनराव बुढळकर, राजेंद्र रोकडे, अतुल कळसकर, सुगत धांडे, सावतराम धांडे, विनोद धांडे, लक्ष्मन धांडे, राजकुमार दामोदर यांच्यासह गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अभिमन्यू धांडे तर आभार रमेश धांडे यांनी मानले.
अधिक वाचा : नवनिर्वाचित CEO यांच्या हस्ते लघु उद्योग करणाऱ्या दिपालीताई देशमुख ह्यांना PMSYM कार्ड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola