अकोला (योगेश नायकवाडे): सर्व जिल्ह्यामध्ये सध्या प्रधानमंत्री श्रम योगी योजनाची सर्व कॉमन सर्विस सेंटर वर एकच गर्दी होत आहे. सर्व लहान व्यावसायिक आपले पेन्शन खाते रजिस्टर करत आहेत. त्यात या योजने मध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधीकारी यांनी जातीने लक्ष घातले आहे. त्यानुसार आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर आयुष प्रसाद यांच्या हस्ते अकोला युवा उद्योजक फेस्टिव्हल मध्ये pmsym कार्ड लघु उदयोग करणाऱ्या महिला दीपाली देशमुख राहणार तेल्हारा यांना दिले. सोबतच CEO कार्यालय अंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करत असलेल्या 10 कामगारांची प्रथम नोंदणी करून देण्या करिता CEO सर यांनी आपल्या पगारातून नोंदणीची रक्कम दिली.
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व असंघटित कामगारांना या सामाजिक भावनेतून आव्हान केले आहे की आपले वृद्धापकाळ आपण प्रधानमंत्री श्रम योगी योजनेंतर्गत सुरक्षित करू शकता तरी सर्व कामगारांनी कॉमन सर्विस सेंटर येथे जाऊन आपली लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी. नोंदणी अभियान अंतर्गत केंद्र चालक सिदार्थ मेढे, श्रीनाथ गलीतकर, आनंद चौधरी, अमोल इढोले, उज्वला पुंडकर, ताकवले, प्रफुल्ल पाटिल यांनी नोंदणी करून जण सामान्य ना प्रोत्साहित केले. जिल्हा व्यवस्थापक प्रीती शिंदे मॅडम आणि सचिन कसले सर यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार व्यक्त करून त्यांना अश्या सामाजिक कामाच्या शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा : अकोला स्टार्टअप फेस्टच्या माध्यमातून भविष्यात अनेक नवउदयोजक घडतील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola