अकोला (प्रतीनिधी)- महाशिवरात्रीनिमित्त अकोल्याचे आराध्य दैवत असलेले राजराजेश्वर मंदिर सजले आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. या सोबतच मंदिराजवळ वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून मंदिर व पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे.
राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव ‘जय भोले’ च्या गजरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक रात्री १२ वाजेपासून मंदिरात दर्शनासाठी रांग लावतात. या दिवशी मंदिरात आरती आणि होमहवन करण्यात येते. तसेच अनेक भाविक अभिषेकही करतात. तसेच अनेक भाविक मंदिरात साबुदाण्याची उसळीच्या महाप्रसादाची व्यवस्था करतात. सायंकाळी राज राजेश्वराची पालखी काढण्यात येते.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. यावेळी किरकोळ विक्रेत्यांची विविध दुकाने लागतात. या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक पोलीस विभागाकडून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून वाहतूक वळवण्यात आली आहे.
अधिक वाचा : एकीकडे आंनदोस्तव तर दुसरीकडे LOC वर चार जवान हुतात्मा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola