अमृतसर – तब्बल 48 तासानंतर अभिनंदन हे मायदेशी परतत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अटारी-वाघा बॉर्डर सज्ज झाली आहे. अटारी बॉर्डरवर भारतीय जवान आणि जनता पहाटे साडेचार पासून वाट बघत आहेत. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे लवकरच भारतात परतणार आहेत. सध्या ते पाकहून मायदेशी परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या पाकच्या एफ-16 या विमानाला अभिनंदन यांनी खाली पाडले. मात्र पाकच्या दुसऱ्या विमानावर हल्ला चढविताना अभिनंदन यांचे विमान पाकच्या गोळीबारीचा शिकार झाले आणि पाक हद्दीत कोसळले. तेव्हा अभिनंदन यांचे प्राण वाचले असले तरी ते पाक सैनाच्या हाती सापडले. यानंतर भारत आणि संपूर्ण जगाने पाकिस्तानवर आणलेल्या दबावानंतर व जिनेवा करारानुसार पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी काल पाक संसदेत अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्याबद्दल घोषणा केली.
तब्बल 48 तासानंतर अभिनंदन हे मायदेशी परतत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अटारी-वाघा बॉर्डर सज्ज झाली आहे. अटारी बॉर्डरवर भारतीय जवान आणि जनता पहाटे साडेचार पासून वाट बघत आहेत. भारताचे हे वीरपुत्र इस्लामाबादवरुन लाहोरकडे रवाना झाले आहेत. अभिनंदन यांचे आई-वडिल देखील आपल्या वीरपुत्राच्या स्वागतासाठी अमृतसरमध्ये दाखल झाले आहे. दुपारी 4 पर्यंत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
अधिक वाचा : अभिनंदन वर्धमान यांची उद्या सुटका होणार; इम्रान खान यांची घोषणा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola