इस्लामाबाद – ताब्यात असलेल्या भारतीय वायु दलाचे जवान अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान उद्या सोडणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पाकिस्तानच्या संसदेमध्ये ही घोषणा केली. भारतीय वैमानिकास पाकिस्तानने तात्काळ मुक्त करावे. मात्र, त्यासाठी भारत कोणत्याही प्रकारचा तह पाकिस्तानशी करणार नाही, असा सूचक इशारा भारताने दिल्यानंतर पाकिस्तानला नमावे लागले आहे.
दोन्ही देशातील संबंध सुधारणार असतील तर आम्ही भारताच्या वैमानिकास सोडण्याचा विचार करणार, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यानंतर भारताने संतप्त प्रतिक्रीया दिली होती. पाकिस्तानने वैमानिकास त्वरीत मुक्त करवावे. मात्र, या बदल्यात आपण असा कोणताही करार करणार नाही ज्यामुळे दहशतवाद विरोधी कामगीरी कमकूवत होईल, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली होती. यानंतर पुढच्या परिणामांची दक्षता घेत पाकिस्तनने हा निर्णय घेतला.
अधिक वाचा : भारतीय वैमानिकाला सुखरूप परत पाठवा, पायलट पाकच्या ताब्यात असल्याचे मान्य; पुलवामाचे पुरावेही दिले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1