अकोला (प्रतिनिधी ) : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 विचारात घेऊन मतदार नोंदणी झालेली नाही अशा वंचित राहिलेल्या नागरीकांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर दि. 2 व 3 मार्च 2019 रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी मा. निवडणूक आयोगाच्या No Voter to be left behind या घोषवाक्यानुसार अदयाप काही मतदार या मतदार यादीत नाव नोंदणीपासून वंचित राहिले असल्यास त्यांनी सदर मोहिमेचा लाभ घेवुन मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ठ करण्यासाठी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे विहीत नमुना 6 मध्ये अर्ज करावा किंवा मतदार नोंदणी कार्यालय व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय येथे अर्ज दाखल करावे. तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरूस्ती करणे, नाव वगळणे इत्यादी करिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे आवश्यक फॉर्म भरून देण्यात यावे.
मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटविण्यासाठी असून मतदाराचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते. करीता मतदारांनी त्यांचेकडे ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत त्याचे नांव असल्याची खातरजमा करावी.
भारतीय संविधानाने भारताचा मतदार होण्याचा बहुमुल्य अधिकार मतदाराला दिलेला आहे तरी सशक्त लोकशाही, बलशाली भारत होण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी या मोहीमेमध्ये आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola