मुंबई – बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच ‘पती, पत्नी और वो’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. १९७८ साली आलेल्या ‘पती पत्नी और वो’ चित्रपटात संजीव कपूर यांची मुख्य भूमिका होती. आता याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्रींची वर्णी लागली असून चित्रपटाची रिलीज डेटदेखील समोर आली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. १० जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टी-सीरिज आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकचे नावही ‘पती पत्नी और वो’, हेच असणार आहे.
Release date finalised… #PatiPatniAurWoh to release on 10 Jan 2020… Stars Kartik Aaryan, Bhumi Pednekar and Ananya Pandey… Directed by Mudassar Aziz… Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Juno Chopra and Abhay Chopra. pic.twitter.com/Lr8P1UQ3rs
— taran adarsh (@taran_adarsh) February 25, 2019
सुरूवातीला या चित्रपटात तापसी पन्नु झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, नंतर या चित्रपटात अनन्याची वर्णी लागली आहे. याबाबत तापसीने खंतही व्यक्त केली होती. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी तापसीसोबत फक्त चर्चा केल्याचा खुलासा केला आहे. तापसीला या चित्रपटात घेण्याबद्दलचे कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते. चित्रपटाच्या स्टार कास्टसाठी अनेक कलाकारांशी चर्चा करण्यात आली होती. त्यात तापसीदेखील होती, असेही निर्मात्यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : ‘टोटल धमाल’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola