नवी दिल्ली – पुलवामा हल्ल्याच्या 12 दिवसानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी मिराज-2000 लढाऊ विमानांनी सीमा रेषा (एलओसी) ओलांडाऊन पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मध्ये घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केली. 12 मिराज विमानांनी 1000 किलो बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये अनेक दहशतवादी कॅम्प नष्ट झाले. वायुसेनेच्या सूत्रांनी या हल्ल्याचा दावा केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट, चकोटी, मुझफ्फराबाद येथील जैशचे कॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. बालाकोट पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाह येथे आहे. हल्ला केलेले ठिकाणी एलओसीपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.
अधिक वाचा : पुलवामात पुन्हा हल्ला; मेजरसह चार जवान शहीद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1