अकोला (प्रतिनिधी)– शहरातील किल्ला चौक ते बायपास या राज्य महामार्गावरील डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते. यानंतर या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाची चौकशी करू, असे सांगितले. तसेच रस्ता चांगला करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले.
किल्ला चौक ते बायपास या राज्य महामार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम नियमांनाधरून नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात आवाज उठवला. संबंधित ठेकेदार आपला फायदा पाहून या रस्त्याच्या कडेच्या दोन्ही बाजूनी २-३ फूट डांबरीकरण सोडून रस्ता तयार करत असल्याचे निदर्शनास आले. या रस्त्याचे काम निविदेनुसार आणि ऑर्डरनुसार होत नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी कुठलाही सूचनाफलक संबंधित कंत्राटदाराने काम करण्याच्या ठिकाणी लावलेला नव्हता. त्यामुळे ठेकेदाराच्या काम करण्याच्या पद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराविरोधात ईटीव्ही भारतने ९ फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित केले. या बातमीची दखल बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धिवरे यांनी घेतली. त्यांनी तातडीने संबंधित कंत्राटदाराची कानउघडणी करत रस्त्याचा दर्जा चांगला ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार नागरिकांच्या तक्रारीनुसार कंत्राटदाराने काम करत या तक्रारी दूर केल्या. आता हा रस्ता योग्य पद्धतीने पूर्ण झाला आहे. हे काम चांगल्यापद्धतीने झाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले आहेत. या संदर्भात कार्यकारी अभियंता धिवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
अधिक वाचा : बांधकाम दुर्घटनेतील संबंधितांवर जबाबदारीसाठी धोरण तयार करण्याचे डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola