मुंबई(प्रतिनिधी) – भाजप-शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर अफझलखानाशी युती करणाऱ्याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, असे सांगून शिवसेनेला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. सत्तेसाठी लाचार शिवसेनेची अवस्था “वाकला कणा, मोडला बाणा, म्हणे मला वाघ म्हणा…,’ अशी झाली असल्याची टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
शिवसेना भवनावरून शिवाजी महाराजांची प्रतिमा शिवसेनेने हटवावी, अशी मागणी करून पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले, “”शिवसेना ही आता कीवसेना’ झाली आहे. आज सगळ्यांत जास्त दुःखी, असहाय व मानसिक धक्क्यात शिवसैनिक आहेत. येणारी निवडणूक मोदी समर्थक व मोदीविरोधक यांच्यामध्ये होणार आहे. भाजप-शिवसेनेची अभद्र युती ही कॉंग्रेस महाआघाडीच्या फायद्याची असणार आहे. मोदीविरोधाचे खोटे मुखवटे गळून पडले, हे चांगले झाले. भाजपचा पराभव करण्याकरिता सर्व जनता एकवटली आहे. त्यामुळे शिवसैनिकही आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान करतील. पाच वर्षांतील पापांचा घडा दोन्ही पक्षांना एकत्रितपणे उचलावा लागेल.”
ते म्हणाले, “”गेली पाच वर्षे भाजप-शिवसेनेने जनतेला विश्वासघाताचा चित्रपट दाखवला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून ऑस्करचे नामांकन मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. या दोघांच्या उत्कृष्ट अभिनयाने जनतेची फसवणूक मात्र निश्चित झाली आहे. सत्तेच्या स्वार्थापायी दोन्ही पक्ष एकत्र आले असले, तरी या दोघांच्या मुखातून आलेले जनतेच्या मनातील प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. कॉंग्रेस पक्ष आज तेच प्रश्न त्यांना विचारत आहे.”
अधिक वाचा : तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurA