नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आजकाल आपल्या प्लॅन्सच्या बाबतीत सतत चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच बीएसएनएलने आपले जुने प्लॅन अपडेट करण्या बरोबरच काही अन्य नवीन प्लॅनही लाँच केले आहेत. खाजगी टेलिकॉम कंपनी जसे की, रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन, आयडियामुळे निर्माण झालेल्या तगड्या स्पर्धेमुळे बीएसएनएल काही प्रमाणात मागे राहिली आहे. आता या स्पर्धेत टिकून राहण्यालाठी बीएसएनएलने कंबर कसली आहे आणि लाँच करण्यात आलेल्या प्लॅन्सवरून हे सिद्ध होत आहे.
नवीन प्लॅन्स लाँच करण्या व्यतिरिक्तही बीएसएनएल आपल्या आता उपलब्ध प्लॅनमध्ये बदल करून ग्राहकांना अधिकाधिक फायदा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. अलीकडेच बीएसएनएलने आपल्या ९८ रुपयांच्या डेटा सुनामी प्लॅनमध्ये बदल केला आहे.
बीएसएनएलद्वारे करण्यात आलेल्या या बदलानंतर ग्राहकांना ९८ रुपयांच्या डेटा सुनामी प्लॅनमध्ये आता दररोज २जीबी हायस्पीड डेटा देण्यात येत आहे जोपूर्वी १.५ जीबी होता. डेटा वाढविण्यासोबतच बीएसएनएलने या प्लॅनची वैधता कमी केली आहे. पूर्वी या प्लॅनमध्ये ग्राहकांना २६ दिवसांची वैधता मिळत होती, पण आता हीच वैधता २४ दिवस करण्यात आली आहे.
बीएसएनएलच्या या डेटा सुनामी प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्वी एकूण ३९ जीबी हायस्पीड डेटा मिळत होता, पण यात दररोज मिळणाऱ्या डेटात वाढ झाल्याने आता तो ४८ जीबी मिळणार आहे. एवढेच नाही तर बीएसएनएल या प्लॅनसोबतच आपल्या ग्राहकांना २४ दिवसांसाठी ईरॉस न्यूचे मोफत सब्सक्रिप्शनही उपलब्ध करून देत आहे. यासाठी ग्राहकांना ईरॉस न्यू अॅप डाउनलोड करून नोंदणीकृत बीएसएनएल मोबाइल नंबरहून लॉगइन करावं लागणार आहे.
अधिक वाचा : शेती उत्पादन वाढीसाठी पदवीचा उपयोग करावा : वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola