• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेती उत्पादन वाढीसाठी पदवीचा उपयोग करावा : वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे , शेतीतील गुणवत्ता वाढावी, सेंद्रीय शेती करावी, जे विकू शकतो तेच शेतात पिकवावे यासाठी कृषी विदयापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांनी शेती उत्पादन वाढीसाठी आपल्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा प्रतिकुलपती चंद्रकांतदादा पाटील ,राणी लक्ष्मीबाई केद्रींय कृषी विश्व विदयालय झाशीचे कुलगुरू प्रा. अरविंद कुमार , महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे तसेच डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला चे कुलगुरु डॉ.विलास भाले व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

पुढे बोलतांना श्री. मुनगंटीवार म्हणाले की, पाच पिढयापासून शेती करणा-या शेतक-यांच्या मुलांनी आधुनिक शिक्षण घेवून शेतात काम करणे आवश्यक आहे असे सांगुन विदयापिठाने आपले तंत्रज्ञान चार भिंतीतून शेतक-यांच्या बांध्यापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. विदयापीठाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य राज्य शासनाकडुन डॉ. पंजाबराव देशमुख विदयापीठासाठी 151 कोटी रूपयाचा निधी देण्यात येईल. यापैकी 50 टक्के निधी संशोधनावर खर्च करावा असे त्यांनी विदयापीठाला निर्देशीत केले. विदयार्थ्यांनी लालबहाद्दूर शास्त्री यांनी देशाला दिलेला जय जवान, जय किसान या मुलमत्रांचा अवलंबन करून भारत मातेच्या शेतक-यांची सेवा करावी. व शेतक-यांना मजबुरीतून मजबुतीकडे नेण्यासाठी प्रयत्न करावे. शासन सर्वोपरी मदत करण्यास तयार असून शेतक-यांच्या शेतातील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी शासन कटिबध्द असून राज्य तिजोरीवर पहिला हक्क हा शेतक-यांचा असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले

यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी स्वागतपर प्रास्ताविकातुन विद्यापीठाच्या वाटचालीचा आलेख उपस्थिता समोर मांडला.

या पदवीदान समारंभात 2068 पदवीधरांना पदवीदान करण्यात आले. यात बी.एस.सी. कृषीचे 1464, बी.एस.सी. उद्यानविद्या 104, बी.एस.सी.कृषी जैवतंत्रज्ञान 46, बी.टेक कृषी अभियांत्रिकी 79, बी.एस.सी. वन विदया 25, बी.एस.सी. कृषी व्यवसाय व्यवस्थापन 25, बी.एस.सी. अन्न शास्त्र 15, एम.एस.सी.कृषी 205, आणि पी.एच.डी.च्या 24 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषकाचे वितरण करण्यात आले. एम.एस.सी. कृषी पदवी परिक्षेत सर्वाधिक मुल्यांक प्राप्त करून लालसिंग राठोड यांनी पाच सुवर्ण पदक व एक रोप्य पदक मिळविले. बी.एस.सी. कृषी पदवी परिक्षेत सर्वाधिक मुल्यांकन प्राप्त करून स्नेहल विनय चव्हाण या

विदयार्थींनीने तीन सुवर्ण , तीन रोप्य , व तीन रोख पारितोषिक मिळविले.
उत्कृष्ट शिक्षक म्हणुन डॉ. निरज सातपुते यांना रजत पदक तसेच आयसीएआरचे उत्कृष्ठ शिक्षक पारितोषिक डॉ. यु.एस. कुळकर्णी यांना देवुन सन्नमानीत केले. यावेळेस डॉ. पी.एच. बकाने, डॉ. एम.बी.नागदेवे , कु. एम.बी. खेडकर, डॉ. एस.आर. काळबांडे, डॉ. यु.एस.कुळकर्णी, श्री.व्ही. पी. खांबलकर, यांना उत्कृष्ठ संशोधन केल्याबद्दल तसेच संशोधन कार्यासाठी व विदयापीठ क्षेत्रातील शेतक-यांना तात्काळ पोचविण्यासाठी यांना रोख पारितोषीक देवुन सन्नमानीत करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ठ संशोधन केल्याबद्दल डॉ. शामसुल हयात मो. शेक यांना सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून जे आर गांवडे व जी एस होगे यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया , आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय रायमुलकर व माजी आमदार श्री. जवेरी तसेच विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेचे सदस्य, प्राचार्य, प्राद्यापक,संशोधक,विभाग प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित होते.

अधिक वाचा :पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

अकोल्यात टँकर उलटला, टँकरमधील हाइड्रोजन पेरोक्साइडची गळती

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
अकोला

अकोल्यात टँकर उलटला, टँकरमधील हाइड्रोजन पेरोक्साइडची गळती

तेल्हारा

तेल्हारा येथे २४ कुंडीय महायज्ञ व संस्कार मेळाव्याला भाविकांची गर्दी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.