अकोला (प्रतिनिधी) – शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आज सायंकाळी ७ वाजता महाराणा प्रताप बागेपासून मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये युवती, महिला व युवकांचा समावेश होता. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही होता.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यावर्षी शिवजयंती महोत्सव सप्ताह समितीतर्फे घेण्यात आला. या सप्ताहादरम्यान विविध स्पर्धा, महिलांसाठी कार्यक्रम घेण्यात आले. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि पुरातन युद्धकलेचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून समितीतर्फे महाराणा प्रताप बागेतून मशाल रॅली काढण्यात आली.
सिटी कोतवाली चौक, टिळक मार्ग, शिवाजी विद्यालयानंतर शिवाजी बागेत ही रॅली आल्यानंतर तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये महिला, युवती, युवक व पुरुषांचा सहभाग होता. अत्यंत शांततेत ही रॅली काढण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
या रॅलीचे आयोजन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन महल्ले, करण साहू, चंद्रकांत झटाले, कृष्णा अंधारे, मनोज पाटील, पंकज जायले, गोपीअण्णा चाकर, आनंद सुकळीकर यांच्यासह आदींनी केले होते.
अधिक वाचा : शेगाव येथे सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्य भव्य मोटारसायकल रॅली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola