मुर्तीजापूर (प्रतिनिधी)- मुर्तीजापूरपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय आवारे हे गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना (एमपी ०९ एचएच २६५४) ट्रकमध्ये जनावरे डांबन नेत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर त्यांनी या ट्रकचा पाठलाग करीत ट्रकला पकडले. तपासणी केली असता ट्रकमध्ये गोवंश डांबून आणले असल्याचे दिसून आले. त्यांनी ट्रकचालक इमरान खान आणि त्याचे सहकारी असलम खान, सलीम खान, शाहरुख खान, हकीम खान यांना ताब्यात घेतले. ही गोवंश पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थान येथे पाठविण्यात आली आहेत.
त्यांच्याकडून गोवंशासंदर्भातली कुठलीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर मुर्तीजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मूर्तिजापूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे, सतीश सपकाळ, रमेश कश्यप, रविकांत गिरी, सर्वेश कांबे, मनीष मालठाणे, मोहन भेंडारकर, स्वप्नील खडे, संतोष शीरलु, मोहीम खान, अशोक देशमुख यांनी केली.
अधिक वाचा : पातूर तालुक्यातील चरणगाव येथील जातीय दंगल प्रकरणात 155 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola