पातूर (सुनिल गाडगे ) : पातूर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चरणगाव मध्ये झेंडा लावल्याचे कारणावरून दोन समाजात जातीय दंगल शनिवारी रात्री 7:30 वाजता झाली असून यामध्ये तीन फिर्यादी वरून 155आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत फिर्यादी नितेश विश्वनाथ इंगळे वय25 रा ,चरण गाव यांच्या तक्रारी वरून 38 आरोपी विरुद्ध अपराधन, 4/19 कलम 307, 326, 324, 143, 147, 148, 149, 294, 295, 506 भा द वि नुसार गुन्हा दाखल केला आहे यामधील 38 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्या गटातील मंगेश भगवान वाघ वय वय 22 रा,चरणगाव यांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपी40जणांविरुद्ध वरील प्रमाणेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये 34 आरोपींना अटक केली आहे तर 6फरार आहेत या घटनेत पोलीस कर्मचारी बालाजी सानप, देवेंद्र चव्हाण, संतोष जाधव यांना दगड लागून जखमी झाले आहेत पोलीस कर्मचारी महादेव देशमुख यांच्या तक्रारी वरून आरोपी77जणांविरुद्ध शासनाचे कामात अडथळा निर्माण झाला होता म्हणून कलम353 गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही घटनेत गैर कायद्याची मंडळी जमवून लाठी,काठी,पाईप चा वापर करण्यात आल्याचा आरोप परस्पराविरुद केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे या घटनेत हनुमान मंदिरावर दगडफेक केल्याचा आरोप केला आहे गावात सद्यस्थितीत शांतता असून या ठिकाणी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर,उपअधीक्षक विक्रांत देशमुख यांनी भेट देऊन आढावा घेतला आहे.
चांन्नी पोलिस ठाण्याला शिवसेना प्रमुख नितीन देशमुख यांनी भेट देऊन पोलीस यांनी निरपेक्ष चौकशी ची मागणी केली आहे ,यामध्ये निरपराध लोक बळी पडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था पोलीस अधीक्षक यांनी पार पाडावी अशी मागणी केली आहे पोलिस कर्मचारी यांचा अतिरेक झाल्याचा आरोप या दंगल प्रकरणात जे गुन्ह्यात नाहीत त्यांना मारहाण करण्यात आला असल्याचा आरोप आणि महिला व लहान मुलांना लोटलाट आणि दहशत निर्माण केल्याचा आरोप सौ,वंदना शेळके यांनी केला आहे या घटनेचा तपास ठाणेदार प्रकाश झोडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील करीत आहेत.
अधिक वाचा : पातूर तहसीलवर शेतकरी जागर मंचचे धरणे आंदोलन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola