तेल्हारा(प्रतिनिधी)- गेल्या दोन वर्षांपासून लोकजागर मंच विविध सामाजिक उपक्रम राबवत असून शिवजयंतीच्या पर्वावर बालशिवाजी वेशभूषा स्पर्धाचे व शिव अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकजागर मंचाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या संकल्पनेतून मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजयंती निमित्य बाल शिवाजी वेशभूषा स्पर्धेचं तसेच शिव अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले असून यामध्ये ३ ते १२ वयोगटातील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.उद्या दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानिक भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे वेषभूषा स्पर्धा,शिव अभिवादन सोहळा तसेच शिव जयंती निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.सदर सोहळ्याला लोकजागर चे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे,सुधाकर खुमकर,पुरूषोत्तम आवारे,गजानन बोरोकार,अशोक घाटे,श्रीकांत पागृत, गोपाल जळमकार यांच्या उपस्थित सदर सोहळा पार पडणार आहे तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष संदीप गावंडे, शहर अध्यक्ष राजेश काटे यांनी केले आहे.