बाळापूर(शाम बहुरुपे)- माऊली कोचिंग क्लासच्या वतीने आज दि.१६ रोजी पुलवामा येथील भ्याड हल्ल्यामधे शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. तसेच निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कोचिंग क्लासचे संचालक प्रा. दळी सर यांनी विद्यार्थ्यांना घवघवित यश संपादन करुन आपले जीवन सुखदायक कसे बनील याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वर्ग १० व १२ विच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन गजानन जामोदे या विद्यार्थ्यांने केले तर यशस्वीतेसाठी प्रफुल मतलाने, अवेज इकबाल, पवन दांडगे या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. अश्यारितने निरोप समारंभ कार्यक्रम संपन झाला.