हिवरखेड (प्रतिनिधी)-14 फेब्रुवारी रोजी जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे आतंकवाद्यांनी भारतीय वीर जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला त्या विभत्स हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात सीआरपीएफ चे जवान शाहिद झाले होते.
भारतीय जवानांवर पाकिस्तान समर्थित आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून सर्व भारतीयांच्या मनात क्रोधाची ज्वाला जळत आहे..
या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दि 16 फेब्रुवारी 2019 शनिवार रोजी सकाळी 8 वाजता हिवरखेड येथे भव्य निषेध मोर्चा व श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
सदर निषेध मोर्चा सकाळी 8 वाजता ग्रामपंचायत कार्यालय आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक येथून सुरु होऊन महाराजा अग्रसेनजी मार्ग, आणि मेन रोड मार्गे चंडिका चौक येथे पोहोचला नंतर चंडिका चौक येथे श्रद्धांजली सभा संपन्न झाली. त्यानंतर शेकडो नागरिकांच्या सह्यानिशी ठाणेदार साहेबांमार्फत भारताच्या प्रधानमंत्र्यांना आतंकवादी व पाकिस्तानचा कायमचा नायनाट करण्याबाबत निवेदन हिवरखेड च्या सरपंच आणि सर्व माजी सैनिकांच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत देण्यात आले.
सदर निषेध मोर्चामध्ये भारत माता कि जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर ऱहे, इस कायराना हमले का बदला जरूर लेंगा हिंदुस्थान, जनजन कि अब यही पुकार.. पाकिस्तान का करदो तार तार..इत्यादी देशप्रेमी नाऱ्यांनी आपले देश प्रेम व्यक्त केले आणि
पाकिस्तान विरोधी नारे लावून नागरिकांनी या निर्घृण हमल्यावर आपला संताप व्यक्त केला.
यावेळी हजारो देशप्रेमी नागरिक, अनेक आजी माजी सैनिक, सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व संघटना, स्वयंसेवी संस्था, इत्यादींनी स्वयंस्फूर्त सहभाग घेतला..
नंतर अनेक युवकांनी संपूर्ण गावातून मोर्चा काढत पाकिस्तान व आतंकवाद्यांचे पुतळे जाळून जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी हिवरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता..
ह्या घटनेच्या निषेधार्थ हिवरखेड येथील सर्व व्यापारी बांधवांनी आणि डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तपणे दिवसभर कडकडीत बंद ठेवला..
सदर बंद शंभर टक्के यशस्वी ठरला….