तेल्हारा(प्रतिनिधी)-तालुक्यातील तळेगाव बाजार राजीव गांधी विद्यालय येथील एका शिक्षकाने मुख्याध्यापकाच्या त्रासापायी शाळेतच आत्महत्या केल्याची घटना दि १० फेब्रुवारी रोजी घडली होती.याप्रकरणी शाळेचा मुख्याध्यापकाचा अटक पूर्व जामीन सत्र न्यायालयाने आज फेटाळला.
तळेगाव बाजार येथील शिक्षक गजानन इंगळे यांनी मुख्याध्यापक अरविंद गिर्हे यांच्या त्रासापायी शाळेतच एका वर्गखोलीत आत्महत्या केली होती.याप्रकरणी मृतक शिक्षक यांच्या भावाने मुख्याध्यापक अरविंद गिर्हे याच्याविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.घटनेच्या पासून आरोपी मुख्याध्यापक हे फरार असून आज सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता तो आज विद्यमान सत्र न्यायाधीश गणोरकर यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी बाजू मांडली.याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस करीत आहेत.
मृतक शिक्षक यांच्या बॅगमध्ये सापडली मुलीच्या व पत्नीच्या नावे चिठ्ठी
शिक्षक गजानन इंगळे यांनी आपल्या आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या बॅग मध्ये मुलीच्या व पत्नीच्या नावे चिट्ठी लिहली होती ती पोलिसांना तपासा दरम्यान आढळून आली असून यामध्ये त्यांनी म्हटले आहे की कोणाच्या समोर खाली मान घालून जीवन जगू नका मला विद्यालयांमध्ये मुख्याध्यापक गिर्हे यांना 10 हजार रुपये महिना देऊ शकत नाही म्हणून मला त्रास देणे चालू आहे त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे तसेच मी तुझ्यासोबत पूर्ण आयुष्यभर संसार करू शकलो नाही तरी दोन्ही मुलींचे शिक्षण शेती विकून पूर्ण करणे तसेच गिर्हे हे माझे कोणी काहीच करू शकत नाही अशी धमकी देत आहेत.दोन मुली व तू जीवनामध्ये कोणापुढे मान झुकूवू नका अशा प्रकारचा मजकूर मुलीला व पत्नीला लिहलेल्या चिट्ठी मध्ये मृतक गजानन इंगळे यांनी लिहून ठेवला होता.