अकोट (मनीष वानखडे) : चौहट्टा बाजार पोलीस चौकी समोरील दोन ज्वेलर्स दुकान चोरट्यांनीे फोडले असल्याचे आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आले. या दरम्यांन चोरट्यांनी लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगण्यात येतय. पोलीस चौकी समोरील दुकाने फोडल्याने चौहट्टा पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होतोय.
दुसरीकडे रात्रगस्तीवेळी पोलिस झोपा काढतात, हे या चोरीच्या प्रकारानंतर पुढे आले आहे. पोलिस चौकीसमोरही चोरी करण्याचे धाडस चोरटे करू लागल्याने व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.मंगेश कराळे व तळोकार हे दोन ज्वेलर्स दूकाने गुरुवारच्या मध्यरात्री फोडले असून चोरट्यांनी लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगण्यात येतय. पोलिस चौकीसमोर चोरी झाल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आहे. मंगेश मंगेश कराळे व विनोद तळोकार अशी त्या दूकान मालकाची नावे आहेत.
चौहट्टा पोलिस चौकीसमोरच हया चोऱ्या झाल्या आहेत. गुरुवारी रात्रगस्तीवरील पोलिस नेमके होते कोठे ? पोलिस चौकीच्या दारात उभे राहिल्यानंतर ही दुकाने दिसतात. अशावेळी चोरटा या पोलिसांच्या निदर्शनास आला कसा नाही ? रात्रगस्तीचे पोलिस झोपल्यानंतर चोरट्याने संधी साधली आहे. अशी चर्चा सध्या घटनास्थळावर होतंय.
अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola