तेल्हारा (प्रतिनिधी)- शहरातील विकास योजनेतील आरक्षण आरक्षणासंदर्भात शहरातील आरक्षण क्रमांक ४,१३,१४ व १५ मधील नागरिकांना नगरपालिकेने नोटीसा बजावण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने दि.२५ जाने ला नगर परिषद तेल्हारा येथे आयोजित सभेमध्ये नागरिकांनी आरक्षणातून वगळण्याबाबत थानिक नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
तेल्हारा शहरातील आरक्षण क्र.१४ तापडिया नगरमधील नागरिक गेल्या २५ ते ३० वर्षापासून जागा विकत घेवून त्या जागेवर पक्के घरे बांधून वास्तव्य करीत आहेत. ज्य्वेली जागा विकत घेतली त्यावेळी सदर जागा आरक्षित आहे किंवा नाही हे नागरिकांना माहित नव्हते परंतु त्यावेळेस कोणीहि प्रतिबंध केला नाही. वास्तविक हि जागा आरक्षित होती तर मूळ मालकाने घरे बांधतांना किंवा विकतांना प्रतिबंध कार्यच होता परंतु ज्यांचे करिता हि जागा आरक्षित आहे त्यांनी त्या जागेवर बांधकामास प्रतिबंध केला नाही यावरून ज्यांचे करिता हि जागा आरक्षित आहे त्यांना जागेची आवश्यकता नसल्याचे दिसून येते. या जागेवर नागरिक घरे बांधून सह्परीवारासह वास्तव्य करीत आहेत. परंतु सदर जागा आरक्षित आहे या सबब खाली नागरिकांना आय एस डी पी रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नाही तसेच रस्ते, नाल्या, पाणी, किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. आरक्षण केलेल्या जागेवर आज पर्यंत ताब्यात न घेणे, त्या जागेवर वापर न करणे, इत्यादी कारणावरून त्यांना जागेची आवश्यकता नाही हे स्पस्थ होते. त्यामुळे सदर जागेवरील आरक्षण काढून नागरिकांवरील अन्याय दूर करण्याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनावर सुनील राठोड, आरती गायकवाड, नलूताई तायडे, दुर्गाताई भटकर, नरेशआप्पा गंभिरे, प्रतापराव देशमुख, या नगरसेवकांसह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.
अधिक वाचा : मराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिका फेटाळण्याची राज्य सरकारची हायकोर्टाला विनंती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola