अकोला (प्रतिनिधी)- राज्यातील दुष्काळी भागात जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने अखेर जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुष्काळी भागात एका महसूल मंडळात चार चारा छावण्या सुरु केल्या जाणार आहेत. पशु संख्या आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यावर तातडीने उपाययोजना सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
गेल्या दोन वर्षापासून पाऊसमान घटत आहे. मागील खरीप हंगामात राज्यातील बहुतांश मध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जण्यमान झाले. त्यामुळे जलसाठे भरले नाहीत. ग्रामीण भागात टँकर सुरु आहेत. जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बहुतांश भागात हीच परिस्थिती असल्याने शासनाने राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांव्यतिरिक्त 268 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ आहे. तसेच, या क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील 931 गावांमध्ये दुष्काळसद्दश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती मुळे त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न नजीकच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी महसुल मंडळ स्तरावर जनावरांच्या चारा छावण्या उघडण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. एका महसूल मंडळात एक ते चारा छावणी सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
अधिक वाचा : उच्चवर्णीयांना मिळणार १० टक्के आरक्षण; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola