अकोट (प्रतिनिधी)-गायत्री बहुउद्देशिय सेवाकुंज,महेश कॉलोनी अकोट येथे गायत्री परिवाराचे वतीने बालकांमध्ये दिव्य गुणांचे रोपण करणे,जीवनामध्ये ध्येयवर्धक आणि व्यक्ती विकासासाठी प्रेरीत करणे व भारतीय संस्कृती आणि सर्वश्रेष्ठ परंपरेची जाण करवून तसेच शारीरिक,मानसिक आणि आध्यात्मिक गुणांची वाढ करणे स्पर्धात्मक युगामध्ये तनावा पासून बचाव करण्यासाठी व शैक्षणिक दृष्टया त्यांचा विकास व्हावा हा उद्देश समोर ठेवून दि,10 फेब्रुवारी वसंत पंचमी च्या मुहूर्तावर बाल संस्कार शाळेचा (KG1,KG2) मा. अनिल गावंडे संस्थापक अध्यक्ष लोकजागर मंच यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी अनिलभाऊंनी माणूस घडवणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करत सकरात्मक उपक्रमांना कायम सहयोग देण्याचे कबूल केले. यावेळी त्यांनी उपस्थीत महिलांशी संवाद साधत प्रत्येक महिलेला स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी करावं असे वाटते पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आम्ही लोकजागर लघुउद्योग या माध्यामातून महिला बचत गट सोबत घेऊन मशरूम पापड, गुळपट्टी,कुरडी कापडी पिशव्या ईतर खाद्यपदार्थांची मार्केटिंग चेन उभी करत आहोत. उत्पादीत मालाला मार्केट मिळवून देण्याचे काम लोकजागर ने सुरू केले आहे. महिलांनी स्वतःच्या प्रपंच सांभाळत दोन पैसे अतिरिक्त मिळवावेत हा लोकजागर चा मानस आहे असे सांगितले. यावेळी गायत्री परिवार आकोटचे अध्यक्ष दादाभाऊ गावंडे, अशोकराव चौधरी,मेतकर साहेब,अनंत सपकाळ, राजेश गावंडे व गायत्री परिवाराचे पदाधिकारी व सर्व महिला पुरुष सदस्य बहुसंख्येने उपस्थीत होते.
अधिक वाचा : ब्रेकिंग- अकोट अकोला रस्ता मृत्यूचा सापळा, अपघातात दुचाकीस्वार ठार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola