देवरी( मनीष ठाकूर)- अकोला अकोट रोडवरील देवरी फाटा नजीक आज सायंकाळी रस्त्यावरील खड्याने एका २१ वर्षीय मोटारसायकल स्वार तरुणाचा जीव घेतला.यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांनी रस्ता रोको केला होता.
अकोट अकोला रस्त्याचे रुंदीकरनाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून आत्तापर्यंत अनेक जणांना या रस्त्यावर जीव गमवावा लागला असून अपघाताची मालिका या रस्त्यावर सुरू असून आज सायंकाळी 25 वर्षीय तरुणाचा जीव या रस्त्याने घेतला असून मृतक राजकुमार इंगळे रा बळेगाव हा दुचाकी घेऊन जात असताना याच मार्गाने येणाऱ्या पिकअप बोलेरो गाडीचे चालकाने कट मारल्याने दुचाकी स्वार गड्यामुळे पडला त्यामुळे त्याच्या डोक्यावरून बोलेरो गाडीचे चाक गेल्याचे प्रत्यकदर्शी सांगत आहेत.
यावेळी नागरीकांनी देवरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन सूरू केले.व आंदोलना मध्ये नागरीकांनी अकोट चे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनोने यांच्याकडे असा प्रश्न उपस्थित केला की या अकोट अकोला रोड च्या ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करावी व या टुव्हीलर ने अँक्सीडंट झालेल्या यूवकाच्या घरी त्या ठेकेदाराने योग्य ती मदत करावी अशी मागनी नागरीकांनी केली.तसेच सोनोने साहेबानी यावेळी सांगीतले की मी योग्य ती कारवाई त्या ठेकेदारावर करेल अशा प्रकारे नागरीकांच्या सहकार्याने आंदोलन रोकण्यात आले.
अधिक वाचा : बेधुंद दुचाकीस्वारांची दुचाकीला धडक,दुचाकीस्वार जागीच ठार तर बेधुंद दुचाकीस्वार जखमी