अकोला (प्रतिनिधी) – बार्शीटकळी तालुक्यातील शिंदखेडा गावात युवा शेतकऱ्यांने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दोन वर्षाआधी ज्या ठिकाणी त्याच्या मित्राने ज्या झाडाला लटकून आत्महत्या केली त्याच ठिकाणी युवा शेतकऱ्याने आपले जीवन संपविले. बाळू लहू वानखेडे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
बाळू वानखेडे रात्री १२ वाजता घरातून निघून गेला होता. पहाटे त्याचा मृतदेह शेतशिवारातील आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. याबद्दल त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. बार्शीटाकळी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरविला. तसेच तो शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आईवडील, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे. त्यांच्याकडे ४ एकर कोरडवाहु शेती आहे. बाळू वानखेडे याचा मित्र धीरज वानखेडे यानेही दोन वर्षाआधी याच ठिकाणी आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. त्याच ठिकाणी बाळूनेही आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा : शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola