मुंबई : राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एस.टी महामंडळ वातानुकुलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करीत आहे. कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दर कपात करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घोषित केले. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आली आहे.
एस.टी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. सध्या, एस.टी. महामंडळातर्फे राज्यातील विविध ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. कमी झालेल्या तिकीट दरांमुळे खाजगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत जास्त प्रवासी वाढवण्याचे उद्दिष्ट एस.टी महामंडळाने ठेवले असून प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर शयनयान बस सुरु करण्याची तयारी ठेवली आहे. वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असल्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित आरामदायी व किफायतशीर शयनयान प्रवासासाठी एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1