बाळापूर (शाम बहुरुपे): अकोला तालुक्यातील बाळापुर येथे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास पाच लाख रुपयांच्या नकली नोटा पकडल्या. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी नदीम अहेमद यास पकडून अपराध क्रमांक ५९/१९ कलम ४२०,३४ भादवि प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हकीकत अशी की दि. ०७/०२/२०१९ रोजी तक्रार दाऱ्याने फिर्याद दिली की आरोपी ने मला ३ लाख रुपयांचे पाच लाख रुपये देतो असे म्हणुन त्यास बाळापुर शहराचे बाहेर बोलावुन त्याचे कडून ३ लाख रुपये घेतले व त्यास पाच लाख रुपयांच्या नोटा असलेली पिशवी दिली. तक्रार दार याने सदर ५ लाख रुपयांच्या तोटा असलेली पिशवी उघडून बघितली असता त्यामध्ये सर्व बंडल मध्ये वरती एक खरी नोट व खालील सर्व नोटांवर भारतीय बच्चों का बैंक असे लिहिलेले होते. पोलिसे स्टेशन बाळापुर येथे तक्रार दार यांचे रिपोर्ट अप क्र. ५९/१९ कलम ४२०,३४ भादवी प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी १) नदीम अहमद अ. रशीद रा. छोटा मोबीनपुरा बाळापुर यास ताब्यात घेवून त्याचे कडुन गुन्हा करतांना वापरलेली चारचाकी वाहन व एक मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच सदर गुन्ह्यात आरेपी ने तक्रार दारास दिलेल्या सर्व बंडलमध्ये वरती एक खरी नोट व खालील सर्व नोटांवर भारतीय बच्चों का बैंक असे लिहिलेल्या ५ लाख रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या तसेच गुन्हयातील इतर आरोपी चा शोध सुरु आहे.
सदर कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक श्री एम. राकेश कलासागर , अपर पोलीस अधिक्षक, श्री विक्रांत देशमुख मा. प्रो. पोलीस उपअधिक्षक, श्री निलेश देशमुख मा. पोलीस निरीक्षक श्री कैलास नागरे स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे मार्गदर्शना खाली स.पो.नि. रामेश्वर चव्हाण स्थानिक , पो. उप.नि पंकज काकडे, ए.एस.आय. संजय देशमुख,पो.स्टे. बाळपुर, पोहवा. गणेश पांडे, पोहवा. अजय जाणारे, पोहवा. प्रमोद डोईफोडे, ना.पो कॉन्स्टेबल संतोष मेंडे, अश्विन शिरसाट, फिरोज खाज, पो कॉन्स्टेबल मंगेश मदनकार, अक्षय बोबडे सर्व स्था.गु.शा अकोला यांनी केली.
अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola