अकोट (प्रतिनिधी) : मुलांच्या भावविश्वाचा अतिशय प्रभावी वेध घेत तरुणांच्या भाषेत संवाद साधणाऱ्या प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान रविवारी अकोट येथे आयोजित करण्यात आले आहे.
रविवार दि.१० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता दर्यापूर मार्गावरील राज मंगल कार्यालयात हे व्याख्यान होत आहे,यावेळी राज्याच्या महाप्रशासक पदावर नियुक्ती झालेले तेल्हारा तालुक्याचे सुपुत्र ऍड.चंद्रशेखर बाहकर आणि जागतिक कीर्तीचा गिर्यारोहक धीरज कळसाईत यांचा अनिल गावंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
शिक्षणासाठी झटणाऱ्या पालकांची व्यथा आणि शिक्षकांचे योगदान अतिशय प्रभावी शब्दात आणि अभिनय करून मांडण्याचे सामर्थ्य प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या भाषणात आहे.
महाराष्ट्रातील नामवंत विद्यापीठे,युवा महोत्सव यातील हजारो विद्यार्थ्यांपुढे तरुणांच्या भाषेत बोलणारा असा दुसरा वक्ता महाराष्ट्रात नाही,ज्यांची भाषणे आणि प्रेरणादायी पुस्तके विद्यार्थी आणि पालक रांगा लावून विकत घेतात असे मौल्यवान व्याख्यान आपल्याला लोकजागर मंचाने विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे.
केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालक आणि शिक्षक,प्राध्यापक यांनीही आवर्जून ऐकावे असे हे अंतरंग पिळवटून टाकणारे व्याख्यान आहे .नैतिक मूल्य आणि आई वडिलांच्या श्रमाचे वेगळे मोल श्रोत्यांच्या मेंदूत टाकणारे हे व्याख्यान असून हे केवळ भाषण नाही तर माणुसपणाचा संस्कार करणारा एक सत्संग आहे त्यामुळे युवक ,पालक आणि सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकजागर मंच जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार,तालुका अध्यक्ष अनंत सपकाळ, उपाध्यक्ष योगेश जायले,शहर अध्यक्ष सूरज शेंडोकार यांनी केले आहे.
अधिक वाचा : ९ व १० फेब्रुवारी रोजी नागपुरात म.रा.वि.मं. अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola