अकोला (प्रतिनिधी) : कुपोषणावर मात करण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात; मात्र उदासीन प्रशासन अन् पालकांच्या दुर्लक्षामुळे कुपोषणावर मात करण्यात अपयश येत आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून १७२ तीव्र कुपोषित बालके आढळून आली असून, यामध्ये बाळापूर तालुक्याची स्थिती चिंताजनक आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण दोन्ही गटात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण दर महिन्याला केले जाते. सर्वेक्षणात जास्तीत जास्त बालके साधारण वजनाची आढळली. शंभरच्या वर बालके कुपोषणाच्या दुष्टचक्रात अडकल्याचे समोर आले आहे. मध्यम कमी व तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची तपासणी केली असता ४३ बालके अतितीव्र कुपोषित आढळून आले, २६२ बालके मध्यम तीव्र कुपोषित आढळली. बाळापूर तालुक्यात कुपोषणाची स्थिती चिंताजनक असून, तालुक्यात सर्वाधिक १५ बालके ही अतितीव्र, तर ३७ बालके ही मध्यम तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आहेत. त्यावर प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
उंचीनुसार कुपोषित बालकांची स्थिती (ग्रामीण भाग)
तालुका मध्यम तीव्र अतितीव्र
अकोला ग्रामीण १ २६ ३
अकोला ग्रामीण २ २३ ६
बार्शीटाकळी ३१ १
अकोट ६२ ४
तेल्हारा ४९ ६
बाळापूर ३७ १५
मूर्तिजापूर १० ०
पातूर २४ ८
—————————–
एकूण २६२ ४३
अधिक वाचा : ९ व १० फेब्रुवारी रोजी नागपुरात म.रा.वि.मं. अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola