*तेल्हारा तालुक्यात कॉग्रेसचा जनसंपर्क दौरा
*डॉ अभय पाटील यांच्या जनसंपर्क यात्रेला तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद
तेल्हारा (प्रतिनिधी) : आगामी अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याकरिता आवश्यक ती निवडणूकपूर्व तयारीसाठी कांग्रेसचा जनसंपर्क दौरा पूर्ण ताकदीनिशी सुरू असून कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते डॉ. अभय पाटील यांनी तेल्हारा येथील विश्रामगृहावर आज दि. ०५ फेब्रुवारी मंगळवार रोजी पत्रकारांशी संवाद साधतांना केले. ते तेल्हारा तालुक्यात कॉंग्रेसच्या जनसंपर्क दौर्यावर होते.
आगामी निवडणूकपूर्व तयारीसाठी गाव तेथे शाखा व बूथ समितीची बांधणी करून जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाची मोठी फळी तयार झालेली आहे. तसेच कॉंग्रेसची विचारधारा गावागावामध्ये पोहचवून कॉंग्रेसचे जनसंपर्क अभियान सुरू आहे असे डॉ. अभय पाटील यांनी सांगितले, यावेळी ते म्हणाले कि, भाजपाचे शासन सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असून बेरोजगारांना रोजगार, शेतमालाला भाव, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, औद्योगिक विकास,आदी बाबतीत भाजप शासनाने कोणत्याही प्रकारचे ठोस उपाय योजना केल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, व बेरोजगार तरुण कॉंग्रेस कडे आशेने पाहत असल्याचेहि त्यांनी सांगितले.
तेल्हारा तालुक्यात कॉंग्रेसच्या जनसंपर्का दरम्यान त्यांनी आडसूळ, तडेगाव, बाभूडगाव, वांगरगाव,वरुड वडनेर, वाडी अ., निंभोरा, हिवरखेड, राणेगाव, वरुड बि. इत्यादी गावांना भेटी देवून श्रीकृष्ण मंदिर, गाडेगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी,कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. संजीवनीताई बिहाडे, तालुका अध्यक्ष प्रकाश वाकोडे, शहर अध्यक्ष सोनू मलिये, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. प्रदीप ढोले, रमेश ताथोड, डॉ. अशोक बिहाडे, हुकूमचंद शर्मा, प्रशांत देशमुख, प स सदस्य मनीष भांबुरकर, अतुल ढोले, अड. श्रीकृष्ण राहणे, गजानन नेमाडे, देविदास नेमाडे, अनंत सोनमाडे, रजिया पटेल, अब्बू कुरेशी, अनंत दही, आदींसह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : लहुजी शक्ती सेनेने केले लोटांगन आंदोलन!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola