अकोला (प्रतिनिधी) : अकोल्यातील जयस्वाल यांच्या दारू अड्ड्यावरून अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असताना पोलिसांनी छापेमारी करून देशी दारूचा साठा जप्त केला आहे . सोबतच दुचाकी सह सुमारे एक लाखाचे चार हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला . सदर दारू विक्री करणाऱ्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे . अकोल्यातील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी शुक्रवारी सदर कारवाई केल्याने खळबळ उडाली .
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील शिवनी येथील एका शोरूमच्या परिसरातून शेख राफिक शेख शब्बीर रा. शिवणी खदान, समीर पठाण सलीम पठाण रा. शिवणी सुंदर नगर, शेख जमीर शेख इस्माईल रा. शिवणी खदान हे त्या ठिकाणावरून अवैधरित्या देशी दारू विकत असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यानंतर या ठिकाणी कारवाई केली तर दुसऱया कारवाईत श्रीराम वाहूरवाघ, सिद्धेश्वर जाधव, सुरेश ओवे या दारू विक्रेत्यांना रंगेहात अटक करण्यात आली पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी दोन कारवाईत तीन दुचाकी किंमत एक लाख तीस हजार, मोबाइल, देशी दारूचा साठा पंधरा हजार पाचशे अशा दोन्ही कारवाईत सुमारे एक लाखाचे चार हजार रुपयांचा ऐवज जप्त केला जयस्वाल यांच्यावर सालात दोन्ही कारवाईत एमआयडीसी पोलिस ठाण्यात कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : अकोला कोतवाली पोलिसांनी गोमांस पकडले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola